वळती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!

वळती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!

वळती (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वळती येथे आज दिनांक २३ जून २०२५ रोजी शासनाच्या आदेशानुसार शाळा प्रवेशोत्सव उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंदांनी गावात सजवलेली बैलगाडी व ढोल-ताशांच्या गजरात प्रभातफेरी काढत विद्यार्थ्यांचे गावातून स्वागत केले.

मुख्य प्रवेशव्दारावर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व गुलाब पाकळ्यांनी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक सौ. हाके मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय सुसर, उपाध्यक्ष श्री. विकार पटेल तसेच इतर सदस्य, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते नवोदित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

‘एक पेड मा के नाम’ उपक्रमासह देऊळघाटमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा झाला शाळा प्रवेशोत्सव; सेल्फी पॉइंट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, बूट-सॉक्स, वॉटरबॅग, डब्बा आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

अमडापूर येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात; आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते ५० लाखांच्या संगणक कक्षाचे उद्घाटन

या कार्यक्रमाला गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच श्री. सुनील चिंचोले, सेवानिवृत्त शिक्षक श्री. हनुमंतराव धनवे गुरुजी आणि श्री. रामकृष्ण चिंचोले गुरुजी, श्री प्रशांत धनवे, श्री गोपाल भागिले, श्री विलास केसकर यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ठेंग सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. पवार सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्धरित्या मेहनत घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड भात वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण करणारा ठरला आणि नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात झाली.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “वळती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!