आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत वळती, उत्रादा आणि पेठ येथील नवीन पूल व रस्त्याचे जनतेच्याच शुभहस्ते लोकार्पण

आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत वळती, उत्रादा आणि पेठ येथील नवीन पूल व रस्त्याचे जनतेच्याच शुभहस्ते लोकार्पण

चिखली / बुलडाणा कव्हरेज न्युज: चिखली मतदारसंघातील वळती, उत्रादा आणि पेठ या गावांना प्रगतीच्या वाटेवर आणणाऱ्या नव्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण नुकतेच आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत व स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

वळती येथील सवना, चांधई आणि धोडप या गावांना थेट चिखलीशी जोडणाऱ्या नव्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या पुलाचे उद्घाटन स्थानिक ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे पेठ (गोकुळनगर) येथील रस्त्याचेही लोकार्पण करून या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात आले आहे.

हा पूल आणि रस्ते केवळ प्रवास सुलभ करण्यापुरते मर्यादित नसून, शेती, स्थानिक व्यवसाय आणि छोट्या उद्योगांना गती देण्यासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना आधुनिक सुविधांशी जोडण्यासाठी अशा पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. भविष्यातही अशा विकासकामांना गती देऊन चिखली मतदारसंघाचा कायापालट करण्याचे प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी दिली.

वळती येथे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते गोमातेची पूजा, २२ जुलै देशी गोवंश संरक्षण व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार

या लोकार्पण सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव, लीगल सेलचे तालुका अध्यक्ष ॲड. संजय सदार, माजी सभापती सौ. सिंधुताई तायडे, पेठचे सरपंच विष्णू शेळके, उत्रादाचे सरपंच रमेश इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंजाबराव धनवे, सरपंच सौ. उज्जलाताई सुनील चिंचोले, सुनील चिंचोले, उपसरपंच रामकृष्ण गुरुजी, असलम भाई, प्रशांत धनवे, इंजिनिअर सेलचे शहेजाद पटेल, सामाजिक कार्यकर्ते मुज्जू सौदागर, भारत गायकवाड, पंढरी जगताप, शरद हिवाळे, उद्धव चिंचोले, सौदागर जावेद पटेल, रामराव हिवाळे, अशपाक सौदागर आणि नदीम पटेल यांच्यासह गावातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने गावकऱ्यांमध्ये नव्या विकासाची आशा निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत वळती, उत्रादा आणि पेठ येथील नवीन पूल व रस्त्याचे जनतेच्याच शुभहस्ते लोकार्पण”

Leave a Comment

WhatsApp Join Group!