
वळती ग्रामपंचायतीला घरपट्टी कर वसुलीत अपयश, विकासकामांवर परिणाम
वळती (बुलडाणा कव्हरेज न्युज): मागील पाच वर्षांत वळती ग्रामपंचायतीला एकही टक्का करवसुली करता आलेली नाही. यामुळे गावातील विकासकामांवर मोठा परिणाम होत आहे, तब्बल शून्य टक्के करवसुलीमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, विकासकामे अडचणीत आली आहेत. आज वळती येथे झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्यांनी ही माहिती दिली.
ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत गावात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गावाचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून, लोकसहभागही वाढला आहे. मात्र, काही नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. या संदर्भात विचारणा केली असता, मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीला घरपट्टी कर वसूल करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले.
मग एकही टक्का करवसुली नसताना कोट्यवधी रुपयाची झालेली विकासकामे कोणाच्या निधीतून झाली? नक्की कामे झाली का? याबद्दल ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कर वसुली न झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्रोतांवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, मूलभूत सुविधा आणि नव्या विकासकामांवरही मर्यादा आल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कर थकबाकी असूनही तो वसूल करण्यात अपयश येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा- वळती ग्रामपंचायतीत आर्थिक गोंधळ? हजारांचे काम, लाखोंची बिले! अन माहिती देण्यास टाळाटाळ…
ग्रामपंचायतीच्या अपयशामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावाचा विकास पुढे नेण्यासाठी नागरिकांनी वेळेवर कर भरावा, तसेच प्रशासनानेही वसुलीसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी काही ग्रामस्थांकडून केली जात आहे.
1 thought on “वळती गावात 0% करवसुली? ग्रामपंचायत घरपट्टी वसूल करण्यास असमर्थ…”