
वळती (Walti Crime): शीरखुर्मा पिण्याच्या कारणावरून बोलावले आणि जोर जोरात बोलून उकसवण्याचा प्रयत्न केला, पण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळ राहता माघार घेऊन निघून गेले आणि जीवे मारण्याचा कट फसला.
मागील काही दिवसापासून वळती गावातील वार्ड क्रमांक १ मधील रहिवास्यांना गल्लीत सांडपाण्याच्या त्रासाला नाहक सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी गल्लीतील रहिवास्यांनी तक्रार देखील केली होती. पण नंतर हा त्रास जाणूनबुजून देण्यात येत असल्याचे गल्लीतील राज धनवे यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी गावातील सरपंचपती यांना व्हाट्स अँपद्वारे, कॉल करून आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन विनंती केली होती. परंतु “तुम्ही नवीन सिमेंट रोडवर नाली होऊ दिली नाही, म्हणून त्याचे पाप तुम्हाला भोगावे लागतील” असे बोलून त्यावर उपाय करण्यापेक्षा त्यांनी राज धनवे यांना अपमानित करून घरी पाठवले. आणि त्यानंतर गल्लीत सांडपाण्याचे प्रमाण अधिकच वाढले.
त्यानंतर राज धनवे यांनी वळती ग्रामपंचायत सचिव यांच्याकडे देखील तक्रार केली, पण आज करू, उद्या करू असे बोलून ते प्रकरण टाळण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज धनवे यांनी गल्लीत झालेल्या सांडपाण्याच्या योजनेबद्दल, शोष खड्डे योजनेबद्दल आणि इतर योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायत सचिव याना रीतसर अर्ज दिले. अर्ज देऊन ४५ दिवस झाले असताना आज देतो, उद्या देतो असे कारण देऊन कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाला कंटाळून राज धनवे यांनी गावातील समस्यांबद्दल बुलढाणा कव्हरेज वर बातमी टाकण्यास सुरुवात केली असता, खालील लोकांनी कट करून त्यांना जीवे मारण्यासाठी सापळा तयार केला. पण वेळेचे गांभीर्य समजून राज धनवे यांनी काढता पाय घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
सविस्तर वृत्त असे कि, काल दिनांक ४ एप्रिलच्या रात्री ९ वाजेच्या दरम्यान वळती गावातील जाकेर पटेल यांनी त्यांच्या घरी पवित्र रमजान निमित्त शीरखुर्मा पिण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी जाकेर पटेल हे गावातील राज धनवे यांच्या घरी शीरखुर्मा पिण्यासाठी बोलवायला गेले. त्यांच्या जास्तीच्या आग्रहाखातर राज धनवे हे त्यांच्या सोबत शीरखुर्मा पिण्यासाठी गेले असता, जाकेर पटेल यांच्या घरी आधीच गावातील काही मंडळी बसली होती, त्यामध्ये शालिकराम चिंचोले, उद्धव चिंचोले, मधुकर भोरे हे तिघे बसले होते. त्यानंतर जावेद पटेल याना बोलावण्यात आले. आणि भारत गायकवाड व विशाल चिंचोले यांना लवकर बोलावण्यासाठी शालिकराम चिंचोले आणि उद्धव चिंचोले यांच्याकडून आग्रह करण्यात आला. आता हि सर्व मंडळी ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या जवळच्या संबंधात असल्याने यांचा काहीतरी करण्याचा डाव आहे, हे राज धनवे यांच्या लगेच लक्षात आले. त्यानंतर शालिकराम चिंचोले यांनी राज धनवे यांना सहज बोलण्यास सुरुवात केली, त्यामध्ये एकदम सामान्य अशी विचारपूस झाली. आणि हि चर्चा चालू असतांना शोहराब पटेल सर आणि विशाल चिंचोले हे पण आले तोपर्यंत जाकेर पटेल यांनी शीरखुर्मा वाटप केली होती. हे सर्व सामान्यपणे चालू असताना शालिकराम चिंचोले हे जावेद पटेल यांना उद्देशून, राज धनवे यांना उकसवण्यासाठी अचानक मोठ्या आवाजात जोरजोरात राज धनवे यांनी दिलेल्या न्यूजच्या विषयावर बोलायला लागले. नंतर माहिती अधिकाराचे अर्ज मागे घे अन्यथा तुला अन तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकी पण दिली. त्यांच्या बोलण्याचा रोख आणि तीव्रता एवढी जास्त होती कि, ते पाहून राज धनवे यांनी शीरखुर्मा न पिताच काढता पाय घेतला. त्यामुळे वरील मंडळींचा त्यांना जीवे मारण्याचा डाव फसला असल्याचे त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहे.
तसेच, येथून पुढे मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे काही बरे- वाईट झाल्यास त्यासाठी वरील मंडळी आणि ग्रामपंचायत पूर्ण पणे जबाबदार राहील. असे राज धनवे यांच्याकडून सांगण्यात आले. व याची रीतसर तक्रार ते आज पोलीस स्टेशन मध्ये करणार आहेत. आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत जे अर्ज दिले होते, त्याची माहिती न मिळाल्यामुळे प्रथम अपील देखील सादर करणार असल्याचे सांगण्यात आले.