अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — लग्नाचे आमिष दाखवत एका ३२ वर्षीय विवाहितेवर तीन वर्षांपासून संगनमताने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर १८ नोव्हेंबर रोजी आरोपीवर बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले.पीडित महिला दोन अपत्यांची आई असून तिची गावातीलच एका व्यक्तीसोबत मागील तीन वर्षांपासून ओळख वाढली होती. या नात्यात आरोपीने तिला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले. तो वेळोवेळी तिच्या घरी जाऊन तिचा गैरफायदा घेत असे.दरम्यान, १ ऑक्टोबर २०२५ रोजी पीडित महिला घरातील २ लाख रुपये घेऊन आरोपीसोबत जालना येथे पळून गेली. जालना येथील बुरहान नगरात आरोपीने तिला भाड्याने रूम घेऊन दिली. तो तिथेही येत जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे.परंतु १९ नोव्हेंबर रोजी पीडितेने त्याला लग्नाविषयी विचारले असता आरोपीने स्पष्ट नकार दिला.“माझे लग्न झाले आहे, मी पत्नीला सोडणार नाही, तुझ्याशी माझा काही संबंध नाही,” असे सांगून त्याने तिला शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे यांनी आरोपी शेख अनिस शेख युनूस याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(२), ३५२ अनुसार बलात्कारासह इतर गुन्हे नोंदवले आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार; अखेर पोलिसात गुन्हा दाखल…!














