चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात गेल्या काही वर्षांत झालेल्या ठोस विकासकामांमुळे जनता भाजपा पक्षाच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे विरोधकांकडे सांगण्यासारखी एकही विकासाची गोष्ट नसल्याने ते केवळ निराधार आणि खोटे आरोप करत आहेत, अशी टीका आमदार श्वेता ताई महाले यांनी केली.
नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून पंडितदादा देशमुख उमेदवार असून त्यांना शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या विकासकारभारावर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
सर्व प्रभाग मध्ये आता भाजप जोरदार प्रचार सुरू करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप ने मागे केलेल्या विकास अजून जोरात करायचं असेल तर नगरध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे…













