सवना (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विनायक सरनाईक यांनी फेसबुक वर इसोली सर्कल आणि सावना सर्कल आणि शेलुद पंचायत समिती या तिन्ही मतदार संघात कुठ उभे राहायचं अशी पोस्ट केली आणि मत कमेंट मध्ये व्यक्त करा ..त्यांना दोन्ही सर्कल मध्ये अतिशय भावनिक प्रतिसाद देत भाऊ तुम्ही आमच्या कडे ताईला उभे करा आम्ही तुमच्या सोबत आहोत.. काहींनी तर आम्ही वर्गणी जमा करून घरची चटणी भाकर खात प्रचार करू अशी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट होत आहे. मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर हे विनायक सरनाईक यांच्या पत्नीला सवना सर्कल मधून संधी देतात की स्वतः सरनाईक यांना इसोली सर्कल मतदारसंघातून लढवतात पुढील काळात समजेल?
“भाऊ, तुम्ही आमच्या ताईला उभा करा… आम्ही वर्गणी जमवतो, पण तुम्हीच लढा!” अशी हाक सध्या सवना सर्कलमधील जनतेकडून जोरात दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतरा ते अठरा वर्षांपासून लढा देणारे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक पुन्हा एकदा जनतेच्या भावनांच्या केंद्रस्थानी आले आहेत.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरनाईक यांनी गेल्या अनेक वर्षांत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अन्नत्याग उपोषण, रस्ता रोखो आंदोलन, मोर्चे, शेतकरी बैठका, सरकारी कार्यालयांवर ठिय्या आंदोलन अशा असंख्य लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांचा आवाज बुलंद ठेवणाऱ्या या कार्यकर्त्याने अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रश्न मांडले आहेत.
अलीकडेच त्यांनी सवना शेतात पाण्यात बसून ‘जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही’ अशी शपथ घेत आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेनंतर सवना सर्कलमधील गावोगाव, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.
लोक म्हणत आहेत —
“विनायकभाऊ, तुम्ही आमच्यासाठी वर्षानुवर्षे लढत आलात, आता आम्ही तुमच्यासाठी लढू! तुम्हीच आमच्या सर्कलमधून ताईला उभा करा!”
अनेक गावांतील नागरिकांनी स्वखर्चाने वर्गणी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. विनायक सरनाईक यांची सातत्यपूर्ण लढाऊ कार्यशैली, प्रामाणिक भूमिका आणि शेतकऱ्यांसाठी झटणारी वृत्ती पाहता त्यांच्याविषयी लोकांच्या मनात अपार आदर आहे.
सवना सर्कलमध्ये सध्या “सरनाईक उभे राहणार का?” हा प्रश्न चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. अनेकांना वाटते की, “शेतकऱ्याचा आवाज उठवणारा, अडचणींमध्ये सोबत उभा राहणारा नेता हवा असेल, तर तो फक्त विनायक सरनाईकच!”
















