Advertisement Advertisement

वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटींच्या भांडवलाची मागणी – आ. श्वेता महाले पाटील

वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळासाठी 200 कोटींच्या भांडवलाची मागणी - आ. श्वेता महाले पाटील

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील राजपूत समाज हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असा समाज आहे. मराठा समाजात एकरूप होऊनही या समाजाने आपली स्वतंत्र ओळख आणि गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी आणि विशेषतः युवक-युवतींना शिक्षण व व्यवसायात पाठबळ देण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाला सध्या 50 कोटी रुपये भांडवल म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, ही रक्कम अपुरी असून, ती वाढवून 200 कोटी रुपये करण्याची आग्रही मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी विधिमंडळात केली आहे.

ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफी लवकरच, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

राजपुत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आ. सौ. श्वेता महाले यांनी जुलै 2023 च्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने या महामंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापनेस 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळवून दिलेली आहे.

राजपूत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक, युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य करण्यासाठी हे महामंडळ घोषित केलेले आहे.

या महामंडळास 50 कोटींचे आर्थिक भाग भांडवल देण्यात येणार असल्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. परंतु राजपूत समाज हा महाराष्ट्रभर मोठ्या संख्येने आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात युवक, युवती बेरोजगार आहेत, म्हणूनच 50 कोटींचे आर्थिक भाग-भांडवल 200 कोटी करण्यात यावे आणि राजपुत समाजातील युवक, युवतींना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे आ. सौ. श्वेता महाले यांनी विधिमंडळात केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!