चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील उदयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज सारंगधर लाहूडकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) नुसार अपात्र घोषित करण्यात आले आहे. शासन परिपत्रक २७ जुलै २०२५ मधील निर्देश, तसेच राज्य शासनाच्या निधीअंतर्गत चालणाऱ्या कामांबाबत आवश्यक सूचना असूनही त्यांनी त्या जाणूनबुजून पाळल्या नाहीत, असे आदेशात नमूद आहे.मनोज लाहूडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीचा निधी हाताळताना मनमानी केल्याचेही ग्रामविकास विभागाच्यातपासात स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांचे नियमित काम योग्य पद्धतीने करता येऊ नये म्हणून वारंवार हस्तक्षेप केल्याच्या तक्रारी अनेक वेळा नोंदवण्यात आल्या होत्या.शासनाच्या कामात अडथळे निर्माण करणे, विकासकामांना उशीर लावणे, आणि राजकीय द्वेषापोटी निर्णय प्रक्रियेत आडकाठी करणे या सर्व कारणांचा अभ्यास करून लाहूडकर यांच्या मनमानी कारभाराला जबाबदार धरत त्यांना पदासाठी अयोग्य आले निधीचा ठरविण्यात आहे. ग्रामपंचायत पारदर्शक वापर, ग्रामविकासाची गती आणि प्रशासनातील शिस्त यांना धोका निर्माण करणारा हा कारभार जाणीवपूर्वक केला गेल्याचे नमूद करत शासनाने ही कारवाई तातडीने केली. अप्पर आयुक्त अमरावती यांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे शासकीय अधिकारी यांना नियमानुसार कायद्याने काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांनी देखील नियम व कायदा यांचा मान राखला पाहिजे असा धडा मिळाला आहे…
उदयनगर सरपंच मनोज लाहूडकर अपात्र अप्पर आयुक्त अमरावती यांचा आदेश…! मनमानी कारभारात करत आल्याचे आरोप…!














