खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) खामगाव शहरातील एका टायपिंग सेंटरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी जबरदस्तीने मैत्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. मुलीने तरुणाची चुकीची प्रवृत्ती ओळखून त्वरित तक्रार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
घटना अशी…दोघेही टायपिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी येत होते. तरुणाने मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्या व्हॉट्सअॅपवर वारंवार मेसेज पाठवणे सुरू केले. मुलीच्या लक्षात हा प्रकार येताच तिने त्याच्याशी संपर्क तोडला.
पण दुसऱ्याच दिवशी तो तरुण मुलीला प्रत्यक्ष भेटला आणि तिच्या जवळ बसून “माझ्याशी मैत्री कर” अशी मागणी करत दबाव टाकू लागला. मुलीने त्याची मागणी ठामपणे नाकारली आणि थेट खामगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.













