देऊळगाव राजात दु:खद घटना: दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू

करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा येथील त्र्यंबक नगर परिसरात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. वयाच्या अवघ्या दोन वर्षांच्या ईश्वरी अंकुश हरणे या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हरणे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ईश्वरी ही तिच्या घराबाहेर खेळत होती. खेळता खेळता ती अचानक गायब झाली. बराच वेळ शोधाशोध करूनही ती सापडली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी घाबरून स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी मिळून तातडीने शोधमोहीम हाती घेतली.

शोधादरम्यान घरासमोरील एका उघड्या पाण्याच्या हौदाकडे लक्ष गेले. शंका आल्याने हौदातील पाणी काढून पाहिले असता, तिथे ईश्वरीचा निर्जीव देह आढळला. हे दृश्य पाहून कुटुंबीयांचा टाहो फोडला. उपस्थित सर्वजण सुन्न झाले. या घटनेमुळे देऊळगाव राजा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “देऊळगाव राजात दु:खद घटना: दोन वर्षांच्या चिमुकलीचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू”

Leave a Comment

WhatsApp Join Group!