BIGGEST BREAKING..! चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या स्विमिंग पूलमध्ये दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील क्रीडा संकुलात आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक हृदय पिळून टाकणारी घटना घडली. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सध्या ऊन खूप वाढले त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे स्विमिंग पूलवर नागरिकांची व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी असते. मात्र आजच्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या मृत विद्यार्थ्यांची नावे विवेक वायडे आणि तर दुसऱ्या मुलगा सुरेश वानखेडे अशी आहेत. विवेक हा बीड जिल्ह्यातील असून सुरेश हा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आहे. दोघेही बीएमएस कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. काही मित्रांसोबत ते पोहण्यासाठी क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलवर गेले होते.

सायंकाळी अंदाजे साडेसहा वाजता ही घटना घडली. पोहत असताना दोघेही अचानक पाण्यात बुडाले. परिसरात उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Lucky Bhaskar Movie Review: यदि आपके पास पैसा है, तो आपके पास सम्मान और प्यार सब कुछ है।

तात्काळ दोन्ही तरुणांना जवळील चिखली येथील खामगाव रोड भराड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना बघितल्या बरोबर मृत घोषित केले. या घटनेने क्रीडा संकुल प्रशासनाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. स्विमिंग पूलमध्ये जीवनरक्षक किंवा प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते की नाही? याचा तपास सुरू आहे.

चिखली पोलीस अधिक तपास करत असून मृतांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. दोन होतकरू विद्यार्थ्यांचे असे अचानक जाणे हे त्यांच्या परिवारासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठीही मोठे दु:खदायक आहे. या घटनेबाबत अधिक माहिती व निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!