खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ आज शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास दहा वाजता प्रवासी ऑटो आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींमध्ये शेख सईद शेख जाकीर (वय २३), अरबाजखान मुक्तार खान (वय २२), शेख जुनेद शेख रशीद (वय २०) सर्व रा. वरखेड, तसेच दुचाकीस्वार रसूल इमाम सय्यद (वय ४०, रा. वरणगाव) यांचा समावेश आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी शेख सईद शेख जाकीर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, टेंभुर्णा फाट्याजवळील काही मीटरचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली आहे. महामार्ग बांधकाम विभागाकडून या ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
टेंभुर्णा फाट्याजवळ ऑटो-दुचाकीची भीषण धडक; चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक ..!
Published On: November 9, 2025 3:35 pm












