वळती येथील सुभाष भूमकर यांचा नवसपूर्तीचा अनोखा प्रवास; मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी घातले होते साकडे

वळती येथील सुभाष भूमकर यांचा नवसपूर्तीचा अनोखा प्रवास; मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी घातले होते साकडे

चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी सुभाष पुंजाजी भूमकर यांनी श्री स्वामी समर्थ चरणी साकडे घातले होते. हे साकडे पूर्ण झाल्याच्या आनंदात त्यांनी नवसपूर्तीचा एक अनोखा प्रवास ठरवला आहे. हा प्रवास मोटरसायकलवरुन करत, त्यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी चिखली (जि. बुलढाणा) येथील रेणुका माता मंदिरापासून सुरुवात केली असून, हा प्रवास मुंबईतील वर्षा बंगला येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

महाराष्ट्र हादरला! महिलांना गोड बोलून जंगलात न्यायचा अन्… क्रूर सिरीयल किलरच्या अटकेने परिसरात खळबळ

या प्रवासात सुभाष भूमकर यांनी महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे ठरवले आहे. रेणुका माता मंदिरानंतर त्यांचा पुढील थांबा तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोल्हापूर येथील अंबामाता मंदिर, गणपतीपुळे येथील गणपती मंदिर आणि रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असेल. या सर्व पवित्र स्थळांना भेट देऊन ते आपल्या नवसपूर्तीचा सोहळा पूर्ण करतील. शेवटी, मुंबईतील वर्षा बंगला येथे मा. मुख्यमंत्री आणि मा. आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांना श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद देऊन हा सोहळा संपन्न होईल.

Buldhana Murder Case: 19 वर्षीय सनी जाधव याच्या हत्येने बुलढाणा हादरले, प्रेमप्रकरणातून खूनाचा संशय

सुभाष भूमकर हे संपूर्ण प्रवास त्यांच्या मोटरसायकलवर करणार आहेत, त्यामुळे हा प्रवास त्यांच्या श्रद्धेचा आणि समर्पणाचा एक अनोखा दाखला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला जोडणारा आहे. प्रत्येक थांब्यावर ते त्या त्या देवस्थानात दर्शन घेतील आणि पुढील प्रवासाला सुरुवात करतील.

हा प्रवास केवळ धार्मिक नाही, तर त्यामागे सुभाष यांची मा. मुख्यमंत्री आणि मा. आमदार यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर व्यक्त होतो. त्यांनी सांगितले की, “माझा नवस पूर्ण झाला, आणि आता मी माझ्या श्रद्धेने आणि भक्तीने हा प्रवास पूर्ण करत आहे. मा. मुख्यमंत्री आणि मा. श्वेता ताई यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे मला हा सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली.”

सुभाष भूमकर यांचा हा अनोखा मोटरसायकल प्रवास त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांच्या या प्रवासाला सर्वत्रून शुभेच्छा मिळत असून, हा सोहळा वर्षा बंगल्यावर संपन्न होताना त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!