चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): “बेपत्ता झाली” अशी तक्रार ज्यांच्यावतीने पोलिसांत दाखल करण्यात आली होती, ती विद्यार्थिनी अखेर चुलत भावासोबत लग्न करीत आळंदीत सापडली आहे. ही घटना एका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली असून गावात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
१८ वर्षाची त्या मुलगी ही नुकतीच १२ वी उत्तीर्ण झाली आहे. तिच्या वडिलांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाच्या योजना आखल्या होत्या. मात्र ३ जुलै रोजी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले आणि पहाटे ४ च्या सुमारास मुलीने घरातून पलायन केले.
संतापजनक: मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण, दोन आरोपी अटकेत
ती गावातीलच चुलत भाऊ लागणाऱ्या त्या तरुणासोबत पळून गेली. सकाळी उठल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
दरम्यान, ती मुलगी आणि तो मुलगा यांनी आळंदी येथे जाऊन लग्न केले आणि पुन्हा पोलीस स्टेशनला हजर राहून त्यांनी विवाह केल्याची माहिती दिली.
Agri Business Idea 2025: घरबसल्या सुरु करा शेतीतील ‘हा’ व्यवसाय…अन् कमवा महिन्याला लाखो रुपये नफा
विशेष म्हणजे, याआधीही त्या मुलीने शाळेत १० वीमध्ये असताना त्या मुला सोबत पळून गेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या मुलावर वर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
आता पुन्हा एकदा त्याच मुलासोबत पळून जाऊन विवाह केल्यामुळे संपूर्ण गावात आश्चर्य व्यक्त होत आहे. ही बाब त्यांच्या भावकीला देखील कलंक ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले….
3 thoughts on “खळबळजनक..! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबत केल लग्न; चिखली तालुक्यातील घटना…”