शेलुद (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथे आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गणराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पूजाताई गजानन जाधव व तलाठी गजानन जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती.यावेळी पूजाताई जाधव यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्याचा ऐतिहासिक धागा उलगडत पारंपरिक “शाहू–फुले–आंबेडकर” घोषणेत सुधारणा आपण करून करून आता “शाहू–लहू–फुले–आंबेडकर” ही नवी, क्रांतिकारी घोषणा महाराष्ट्राने स्वीकारावी असे आवाहन केले. वस्ताद लहुजी साळवे यांच्या अद्वितीय क्रांतिकारी वारशाचे त्यांनी प्रभावी शब्दांत स्मरण केले.1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापासून ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, वासुदेव बळवंत फडके या सर्व क्रांतिकारकांच्या मागील “गुरुपरंपरा” वस्ताद लहुजी साळवे यांच्यापर्यंत पोहोचते, हे त्या क्षणी मांडलेल्या विचारांमधून प्रकर्षाने जाणवले. सावित्रीबाई फुले यांचे सुरक्षितता रक्षण, देशातील पहिला आखाडा, सर्व जाती–धर्मातील युवकांना शस्त्रप्रशिक्षण अशी वस्तादांची अनन्यसाधारण कार्येही यावेळी उपस्थितांना पुन्हा स्मरणात आणली गेली.पूजाताईंच्या या ऐतिहासिक आवाहनाचे शेलुद नगरीत टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला साळवे परिवारातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. गावातील व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.कार्यक्रमास रामकृष्ण साळवे, श्याम साळवे, नितीन साळवे, शेषराव साळवे, प्रदीप साळवे, रमेश साळवे, दादाराव साळवे, दीपक साळवे, ज्ञानेश्वर साळवे, किशोर साळवे, सुनील साळवे, सतीश साळवे, आकाश साळवे, मंगल साळवे, नीलेश नाडे, विशाल भालेराव, विलास साळवे, रोहित गायकवाड, प्रीतम म्हस्के, भागवत निकालजे, आनंद यांगड, अजय बोके, अभी साळवे, मंगेश साळवे, नीलकंठ साळवे, पवन साळवे, गणेश साळवे, राजेश साळवे, शरद साळवे, राजेंद्र साळवे तसेच वीर लहूजी साळवे आखाडा सक्रिय उपस्थित होता.याशिवाय सरपंच मंगेश इंगळे, भाजप नेते संतोष नाना इंगळे, तसेच शासकीय कंत्राटदार श्री गोपाल राजपूत व गोपाल इंगळे राजपूत आदी मान्यवरांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शेलुदमध्ये आद्य क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे जयंती उत्साहात; ‘शाहू–लहू–फुले–आंबेडकर’ या नवीन घोषणेचा पूजाताई जाधव यांचा पुकारा…














