मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज) –शेळगाव आटोळ सर्कलमध्ये मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण सुटल्यानंतर संपूर्ण राजकीय समीकरणच ढवळून निघाले आहे. या बदलामुळे स्थानिक राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन गटांच्या पुढाऱ्यांची भूमिका काय राहणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
या सर्कलमध्ये अनेक प्रभावशाली नेते कार्यरत आहेत.
त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ,शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ थुट्टे,माजी उपसभापती भानुदास घुबे,आणि पत्रकार उद्धव थुट्टे पाटील या चार नेत्यांची चर्चा सध्या चहुबाजूंनी रंगली आहे.
गजानन वायाळ – जनसंपर्क हेच बळ!
गजानन वायाळ हे गेल्या काही वर्षांत चिखली तालुक्यातील एक प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले आहेत. सरकारी कर्मचारी, समाजातील विविध घटकांशी त्यांचे उत्तम संबंध असून, त्यांचा सतत लोकांमध्ये वावर असतो. त्यामुळे “या वेळी वायाळ आपली पत्नीला जिल्हा परिषदेसाठी रिंगणात उतरणार का?” हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
त्यांच्या जनसंपर्काचा पाया मजबूत असल्याने स्थानिक मतदार संघात त्यांचा दबदबा दिसून येतो.
🔹 एकनाथ थुट्टे – शेतकरी संघटनेचा ताकदवान नेता!
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले एकनाथ थुट्टे हे या गणात भक्कम पकड असलेले नेते आहेत. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात मोठा संपर्क तयार केला आहे. त्यामुळे ते पुन्हा त्यांचा घरातील कोणी महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार का, की नवा चेहरा पुढे करतील? हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
भानुदास घुबे – पंचायत समितीचा अनुभव!
देऊळगाव घुबे येथील भानुदास घुबे यांनी चिखली पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करताना प्रशासनिक अनुभव मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीला मैदानात उतरवून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पुढील काळात ते कोणती भूमिका घेतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
🔹 उषाताई थुट्टे – पुन्हा मैदानात?
पत्रकार उद्धव थुट्टे पाटील यांच्या पत्नी उषाताई थुट्टे या मागील वेळेस मेरा खुर्द पंचायत समिती गणातून निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्या पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत उतरतील का? या चर्चेलाही जोर आला आहे.
सध्या शेळगाव आटोळ सर्कलमधील राजकीय वातावरण तापलेले असून, दोन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात अनिश्चितता वाढली आहे.
आरक्षण सुटल्यानंतर या नेत्यांच्या हालचालींनी नव्या समीकरणांना उधाण आले आहे.
कोण करणार निवडणुकीची पहिली चाल?
वायाळ – थुट्टे – घुबे – थुट्टे पाटील यांच्यात अंतिम बाजी कोण मारणार?
हे लवकरच स्पष्ट होईल, पण एक मात्र नक्की!














