राज्यात शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर; १६ जूनपासून घंटा वाजणार!

राज्यात शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर; १६ जूनपासून घंटा वाजणार!

(बुलडाणा कव्हरेज न्यूज): राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने आता पुन्हा शाळेचा माहोल सुरू होणार आहे. शिक्षण खात्याने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत घोषणा केली असून, शाळा सुरू होण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या शाळा ९ जूनपासून सुरू!

देशभरात अनेक शाळा चालवणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या शाळा यंदा ९ जून २०२५ पासून पुन्हा सुरू होणार आहेत. या शाळांचा शैक्षणिक सत्र एप्रिल महिन्यापासून सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मे महिन्यात उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती. आता सुट्ट्या संपून नव्या वर्गासाठी वर्गखोल्या पुन्हा भरतील.

एसएससी बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू!

राज्य मंडळाच्या (SSC Board) शाळा नेहमीप्रमाणे १६ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा व्यवस्थापनांनी व शिक्षकांनी या नव्या सत्रासाठी तयारी सुरू केली असून, शाळांमध्ये स्वच्छता, सुविधा व इतर आवश्यक कामे अंतिम टप्प्यात आहेत.

शेतकऱ्यांसाठी बँका आहेत, बँकांसाठी शेतकरी नाहीत – आ. सौ. श्वेता महाले यांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा!

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये शाळा उशिरा सुरू होणार

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये १६ जूनपासूनच शाळा सुरू होणार असल्या तरी, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये थोडा विलंब होणार आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे विदर्भातील जून महिन्यातील तीव्र उष्णता. दरवर्षी प्रमाणे यंदाही येथे हवामानाचा विचार करून शाळांना थोडा उशीराने सुरुवात दिली जाणार आहे. हे निर्णय स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात.

नवीन सत्राची तयारी सुरू

शाळांमध्ये नव्या वह्या-पुस्तकांची यादी देण्यात आली असून, पालक आणि विद्यार्थी दोघेही नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी करत आहेत. शिक्षण विभागाने सर्व शाळांना वेळेत सुरू होण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!