चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातून जाणाऱ्या जालना- खामगाव रोडच्या रस्त्यालगत असलेल्या चिखली येथील “संतकृपा हॉस्पिटल”चा उद्घाटन आणि गृहप्रवेश सोहळा बुधवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमास शहरातील तसेच परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
या नव्या हॉस्पिटलचे संचालन डॉ. शिवनंद प्रल्हादराव खेडेकर (M.B.B.S., DCH), डॉ. ज्योती शिवनंद खेडेकर (M.B.B.S., जनरल फिजिशियन) आणि डॉ. रोहित कृष्णाकांत गुप्ता (M.B.B.S., M.D.) या तज्ज्ञ डॉक्टरांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली होणार आहे.
आरोग्यसेवेच्या दिशेने एक पाऊल पुढे…
संतकृपा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत. नवजात अर्भकांसाठी खास अतिदक्षता विभाग, फोटोथेरपी व इन्क्युबेटर युनिट, अंतर्गत औषधोपचार विभाग, ऑक्सिजन व नेब्युलायझर सुविधा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, त्वरित उपचारासाठी रुग्णवाहिका सेवा, तसेच सर्व प्रकारच्या लॅबोरेटरी तपासण्या व एक्स-रेची व्यवस्था येथे उपलब्ध आहे.
हॉस्पिटलमध्ये मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब (हायपरटेन्शन), अपघातग्रस्त रुग्णांची तात्काळ सेवा, त्वचारोग, स्त्रीरोग आणि अस्थिरोगांसाठीही योग्य निदान व उपचार मिळणार आहेत.
रुग्णांसाठी खास सुविधा
- महात्मा फुले जनआरोग्य योजना व पीएम-जय अंतर्गत मोफत उपचार सेवा
- २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध
- प्रत्येक कंपनीच्या कॅशलेस मेडिक्लेमची सोय
- अनुभवी, सेवाभावी आणि तत्पर डॉक्टरांची टीम
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उद्घाटन कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेला हा सोहळा रात्रीपर्यंत रंगत गेला. डॉक्टर दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रिघ लागली होती. उपस्थित प्रत्येक पाहुण्यांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे हा सोहळा खास स्मरणीय ठरला.
संतकृपा हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे चिखली आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळणार असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे हॉस्पिटल एक दिलासा देणारे केंद्र ठरणार आहे.