भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरोसा येथील थुट्टे दाम्पत्याने आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश थुट्टे व रंजना थुट्टे या दोघांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या हृदयद्रावक घटनेनंतर राजकीय नेत्यांचे थुट्टे कुटुंबाला भेट देण्यासाठी येणे सुरूच आहे. मात्र भेटीआधी किंवा भेटीनंतरही कुठल्याही स्वरूपाची ठोस मदत न मिळाल्याने सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.
STATE NEWS : रात्री शारीरिक संबंधं करताना पतीने पत्नीला खूश केलं नाही; रागाचा भरात पत्नीने पतीला…
दरम्यान, आज बारामती येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) युवा नेत्यांनी भरोसाला भेट देण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. मात्र त्यांच्या भेटीमागचा उद्देश काय? ते नुसते सांत्वन करून आणि सरकारवर टीका करत निघून जाणार का? की प्रत्यक्षात थुट्टे कुटुंबासाठी आर्थिक मदत जाहीर करणार? असा सवाल आता राजकीय वर्तुळात आणि जनतेतून विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांत विविध पक्षांचे नेते भेटीला येऊन गप्पा मारून, छायाचित्रे काढून परत जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. परंतु आतापर्यंत कोणीही मदतीचा हात पुढे केलेला नाही. त्यामुळे, आता येणाऱ्या प्रत्येक नेत्याकडे जनतेची नजर आहे – फक्त सहवेदना व्यक्त करणार की कृती करून दाखवणार?
थुट्टे कुटुंबाला हवी खरी मदत, नुसत्या भेटी नव्हे!
या घटनेवरून फक्त सरकारवर टीका करणे किंवा राजकीय भाषणे झोडणे पुरेसे नाही, तर अशा शेतकरी कुटुंबांसाठी तात्काळ आर्थिक मदत, रोजगाराचा पर्याय, आणि पुनर्वसनाची योजना हवी. अन्यथा, अशा भेटींना केवळ राजकीय नौटंकी म्हणावं लागेल, असा सूर जनतेतून व्यक्त होत आहे.
1 thought on “थुट्टे कुटुंबाच्या आत्महत्येनंतर आता राजकीय चर्चांना ऊत : “राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे युवानेते आ.रोहित पवार भेट घेणार… पण मदत करणार का?””