
(स्पोर्ट्स डेस्क,बुलडाणा कव्हरेज) Robotic Camera Dog: भारतात सध्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 18वा हंगाम खेळला जात आहे. या लीगमध्ये एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळत आहेत. काही सामन्यांमध्ये मोठमोठे स्कोअर होत आहेत, तर काही कमी स्कोअरच्या सामन्यांनीही प्रेक्षकांच्या उत्साहाला पार नवी उंची गाठली आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदाच्या हंगामातही याची प्रचिती पाहायला मिळत आहे.
IPL 2025 मध्ये रोबोटिक कॅमेरा डॉग (Robotic camera dog) ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू
आयपीएल 2025 मध्ये एक अनोखा बदल घडला आहे, तो म्हणजे रोबोटिक कॅमेरा डॉग! (Robotic camera dog) चार पायांचा हा रोबोट तंत्रज्ञानाचा अजोड नमुना आणि मनोरंजनाचा नवा चेहरा बनला आहे. आयपीएलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे याची माहिती समोर आली. या व्हिडिओमध्ये न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डॅनी मॉरिसन यांनी या रोबोटिक डॉगची ओळख करून दिली. मॉरिसन यांनी सांगितले की, हा भविष्यवादी पपी आयपीएल 2025 च्या प्रसारण संघाचा एक भाग असेल.

डॅनी मॉरिसन यांनी Robotic camera dog बद्दल सांगितले खास वैशिष्ट्ये
मॉरिसन म्हणाले, “हा रोबोट चालू शकतो, धावू शकतो, अभिवादन करू शकतो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पाळीव प्राण्याच्या दृष्टिकोनातून दृश्य टिपतो.” व्हिडिओमध्ये हा रोबोटिक साथीदार मागच्या पायांवर उभा राहतो आणि आपल्या पंजांनी मेकॅनिकल हृदयाचा आकार बनवतो. यावर मॉरिसन यांनी मिश्किलपणे म्हटलं, “खूप जवळ जाऊ नका!”
M S Dhoni: महेंद्रसिंग धोनीला दुखापत, IPL 2025 चे उरलेले सामने खेळणार का? चाहत्यांमध्ये चिंता
रोबो-डॉगने सर्वांना केलं थक्क
मॉरिसन यांनी सांगितलं की, या रोबोटच्या नाकाच्या जागी कॅमेरा बसवण्यात आला आहे. हा मेकॅनिकल पपी केवळ शोभेची वस्तू नाही, तर तो चालतो, धावतो, उडी मारतो आणि क्रिकेटच्या गतिमान दृश्यांना कॅमेऱ्यात टिपतो. 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान प्रथम सक्रिय झालेल्या या रोबो-डॉगने सर्वांचं लक्ष वेधलं. खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला, तर प्रेक्षक पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले.
IPL 2025 अनोखा उपक्रम
व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने उत्साहाने या रोबोटचं Robotic camera dog स्वागत केलं, तर दिल्लीचा अक्षर पटेल पूर्णपणे गोंधळलेला दिसला. मुंबईच्या रीस टॉपलीला तर हा डॉग उभा राहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला. आयपीएलने आता या रोबोटिक चमत्काराचं नाव ठरविण्यासाठी एक खास मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही फक्त सामना पाहू नका, तर या रोबो-डॉगवरही लक्ष ठेवा, जो या स्पर्धेचा सर्वात अनपेक्षित MVP (मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर) ठरू शकतो!
1 thought on “IPL 2025 मध्ये चमकतोय नवा तारा, Robotic Camera Dog ची फॅन्समध्ये चर्चा; जाणून घ्या नव्या तंत्रज्ञानाविषयी नवीन गोष्टी”