X

“पप्पी दे” असे म्हणत ७३ वर्षीय म्हाताऱ्याने क्लिनिकमध्ये जाऊन २७ वर्षाच्या रिसेप्शनिस्ट ला एकट पाहून लावला गालाला हात…

“पप्पी दे” असे म्हणत ७३ वर्षीय म्हाताऱ्याने क्लिनिकमध्ये जाऊन २७ वर्षाच्या रिसेप्शनिस्ट ला एकट पाहून लावला गालाला हात...

पुणे (बुलडाणा कव्हरेज न्युज): विश्रामबाग परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७३ वर्षीय वृद्धाने एकट्या असलेल्या तरुणीशी अश्लील वर्तन करत तिला मानसिक त्रास दिला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ही घटना ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुरेशचंद चोरडिया (वय ७३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये आला होता. त्या वेळी रिसेप्शनवर फक्त पीडित तरुणीच उपस्थित होती.

खळबळजनक..! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबत केल लग्न; चिखली तालुक्यातील घटना…

या संधीचा गैरफायदा घेत चोरडियाने तरुणीच्या गालाला हात लावत “पप्पी दे” अशी अश्लील मागणी केली. इतकेच नाही, तर त्याने खिशाकडे इशारा करत “माझ्याकडे पैसे आहेत, तुला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो. तू मला जे हवे ते कर, मी तुला जे हवे ते देतो” असे उद्गार काढले.

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तात्काळ क्लिनिकमधून बाहेर पळ काढला. मात्र, आरोपीने तिचा पाठलाग करत “उद्या क्लिनिकमध्ये आहेस का?” असा प्रश्न विचारून तिला आणखी त्रास दिला. या संपूर्ण घटनेमुळे तरुणी प्रचंड मानसिक तणावात आली. अखेर तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी सुरेशचंद चोरडिया याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on ““पप्पी दे” असे म्हणत ७३ वर्षीय म्हाताऱ्याने क्लिनिकमध्ये जाऊन २७ वर्षाच्या रिसेप्शनिस्ट ला एकट पाहून लावला गालाला हात…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!