चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस पक्षाने सर्वसाधारण कुटुंबातील, सुशिक्षित आणि लोकाभिमुख तरुणांना संधी देत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व उभे केले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संघर्षातून पुढे आलेले प्रीती ताई बांडे–फुलझाडे आणि संतोष गवारे हे दोन्ही उमेदवार श्री. काशिनाथप्पा बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपणे राजकारणात पुढे येत आहेत.
प्रीती ताई — सुशिक्षित, आधुनिक विचारांच्या आणि कामकाजात अचूकता असलेल्या महिला उमेदवार
प्रीती ताई बांडे–फुलझाडे या Government Engineering College मधून B.Tech केलेल्या, तांत्रिक जाण असलेल्या आणि व्यवस्थापन कौशल्यात पारंगत उमेदवार आहेत.
त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही चिखलीत असल्याने त्या प्रभागातील प्रत्येक भागाशी जवळून जोडलेल्या आहेत.
जनतेशी सहज संवाद, समस्यांचा अभ्यास करून उपाय शोधण्याची वृत्ती आणि तरुणांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व यामुळे त्या प्रभागासाठी आशेचा नवीन किरण ठरत आहेत.
महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसोबत असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध त्यांना “आपल्याच घरातील उमेदवार” बनवतो.
संतोष गवारे …. सर्वसाधारण कुटुंबातील संघर्षातून घडलेले उमेदवार….
संतोष गवारे हे शिस्तबद्ध, मेहनती आणि समाजकारणासाठी समर्पित उमेदवार म्हणून ओळखले जातात.
काशिनाथप्पा बोंद्रे यांच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःचा राजकारणातील प्रवास सुरू केला आहे.
दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक १ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध आहेत.













