चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून चिखली नगरध्यक्ष पदासाठी उमेदवारी काँग्रेस कडून काशिनाथ बोंद्रे यांना सुद्धा प्रचंड मोठा पाठिंबा मिळत आहे आणि प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेस पक्षाकडून प्रिती समाधान बांडे फुलझाडे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधताना स्पष्टपणे सांगितले की,
“मी फक्त नगरसेवक म्हणून नाही, तर तुमची खरी जनसेवक म्हणून काम करत राहील.”
त्यांच्या या वक्तव्याला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी भावना व्यक्त केल्या की,“आम्हाला अशाच जनतेसाठी काम करणाऱ्या जनसेवकाची गरज आहे.”
यामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रिती समाधान बांडे फुलझाडे यांच्या उमेदवारीला चांगले वातावरण तयार झाले असून चर्चा रंगू लागल्या आहेत.













