प्रशांत ढोरे पाटील यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२५ जाहीर

चिखली (उद्धव पाटील- बुलडाणा कव्हरेज न्युज): सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्यासाठी समाजसेवक श्री. प्रशांत ढोरे पाटील यांना प्रतिष्ठित “भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार-२०२५” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

चिखलीच्या पवन लोणकरांचं “ओढ तुझ्या पंढरीची” हे पहिलं भक्तिगीत प्रदर्शित!

प्रशांत पाटील हे केवळ समाजसेवकच नाहीत, तर एक उत्कृष्ट लेखक देखील आहेत. त्यांचे इंग्रजी पुस्तक The Secret of Happiness हे Amazon वर बेस्टसेलर ठरले असून, जगभरात त्याला मोठी पसंती मिळाली आहे. याशिवाय, त्यांचे मराठी पुस्तक छत्रपती शिवरायांची राजकीय रणनीती व कूटनीती देखील प्रकाशित झाले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचारांचा प्रसार होत असून, अनेकांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

Ahalya Short Film Review: १४ मिनिटाच्या या रहस्यमयी थ्रिलरचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर तुम्हाला घाम येईल.

प्रशांत पाटील यांनी सामाजिक कार्यातून जनजागृती, सेवा आणि विशेषतः युवकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातील निष्ठा, समर्पण आणि संवेदनशीलतेमुळे त्यांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या या कार्याचा सन्मान असून, तो निश्चितच अभिमानास्पद आहे.

Mofat Pith Girni Yojana: महिलांसाठी सुवर्णसंधी, मोफत पीठ गिरणी योजना सुरू, असा करा अर्ज

या यशानिमित्त त्यांच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. समाजसेवक म्हणून त्यांनी उभा केलेला आदर्श हा नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!