बुलढाण्यात बसस्थानकाजवळ युवकावर प्राणघातक हल्ला! हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बसस्थानकासमोर एक धक्कादायक घटना घडली. इंदिरानगर येथील एका युवकावर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी फायटरसारख्या धारदार वस्तूने हल्ला केला.

हल्ल्यात युवकाला डोक्यावर आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली असून तो जागेवरच कोसळला. तिथून जाणाऱ्या एका नागरिकाने रुग्णवाहिका बोलावून जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.हल्लेखोर हल्ल्यानंतर लगेच घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला असून हल्ल्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की दुसरे काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!