चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — “चिखली शहराच्या अभूतपूर्व विकासाची हीच योग्य वेळ आहे” असा ठाम संदेश देत प्रभाग क्रमांक १ मध्ये आज घेतलेल्या संवाद बैठकीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभाग एक सह आणि चिखली शहर विकासाच्या मोठ्या उंबरठ्यावर चिखली उभे असून हा बदल केवळ प्रामाणिकपणे करू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नगराध्यक्ष पदाचे अधिकृत काशिनाथ बोंद्रे यांच्या नेतृत्वात नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग एक मधील श्री. प्रीती ताई बांडे फुलझाडे प्रचारार्थ प्रभाग १मध्ये संवाद बैठक घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा स्पष्टपणे मांडल्या.
प्रभाग १ मधील नागरिकांनी बैठकीदरम्यान आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि मिळालेला उत्साही प्रतिसाद लक्षवेधी ठरला. शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकजूट होऊन चिखलीला हक्काचा विकास मिळवून देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत बैठकीतून व्यक्त झाले.













