बुलडाणा ( बुलडाणा कव्हरेज न्युज)नगर पालिका निवडणुकीचे मतदान आटोपले असले तरी मतमोजणी बाकी आहे. त्यामुळे अजुनही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणुन पोलिस सध्या व्यस्त आहे. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पोलिस वसाहतीत मस्त लुट केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या बाबत पोलिस स्टेशनला माहिती घेतली आसता. प्राथमिक माहितीनुसार पाच ठिकाणी ही चोरीची घटना समोर आली आहे.आज ६ डिसेंबर रोजी बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील देवीच्या मंदिर परिसरात पोलिस वसाहत आहे. या वसाहतीत चोरांनी पाच ठिकाणी हात साफ केला आहे. यामध्ये पैसे व दागिन्यांचा समावेश आहे. चोरांनी जवळपास वीस लाखांची चोरी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये ए एस आय वारे, पोलिस कॉन्स्टेबल रुबिना शेख, जितेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह इतरांच्या घरी चोरी झाली आहे. जितेंद्रसिंग ठाकूर यांचा परिवार शेताच्या कामानिमित्त बाहेर गावी गेलेला होता. पोलिस वसाहतीमधील निवास स्थानी आल्यानंतर त्यांना घरामध्ये चोरी झाल्याची घटना दिसुन आली. कपाटामधील दहा तोळे सोने चोराने चोरून नेले आहे. तर रुबिना शेख यांच्या घरामधील रोकड चोरट्यांनी चोरून नेली. घटनास्थळांपासून अधीक्षक कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. तर ग्रामीण पोलीस स्टेशन जवळच असल्यामुळे पोलिसांची वर्दळ असणाऱ्या या परिसरात चोरट्यांनी हात मारला.
पोलिसांचीच घर सुरक्षित नाहीत; तर सामान्य माणसाची घर कशी सुरक्षित असणार…! पोलिस वसाहतीतील पाच घरात जबरी चोरी.
Published On: December 7, 2025 3:14 pm













