तरुण शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या…

तरुण शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या…

पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिंपळगाव सराई येथे एका २६ वर्षीय तरुणाने गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

शंकर राजेंद्र गुंड (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र गुंड यांचा मुलगा होता. नेहमीप्रमाणे सकाळी गाईचे दूध काढण्यासाठी तो गोठ्यात गेला होता. दूध काढून त्याने कॅन गोठ्याच्या बाहेर ठेवले आणि त्यानंतर दोरीच्या साह्याने गोठ्याच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी रायपूर पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर जोशी व अझरुद्दीन काजी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!