सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पेनटाकळी धरणात उडी घेत संपवले जीवन

पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): घराच्या बांधकामासाठी माहेरून ३० हजार रुपये आणा, अशी मागणी करून पती, सासू, सासरा आणि दिर यांनी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून एका विवाहितेने पेनटाकळी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

डॉक्टरने स्वतःला भर रस्त्यात पेटवून घेतले, प्रकृती गंभीर; नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील घटना, व्हिडिओ वायरल

मृत महिलेचे नाव आशा किशोर गायकवाड (वय २७, रा. नायगाव खुर्द, ता. चिखली) असे आहे. तिचे पती किशोर शामराव गायकवाड, सासरे शामराव मारोती गायकवाड, सासू सखुबाई शामराव गायकवाड आणि दिर मधुकर शामराव गायकवाड हे एकत्र राहत होते. आशाला आठ वर्षांचा मुलगा स्वराज आणि तीन वर्षांची मुलगी काव्या आहे.

सासरच्या मंडळींकडून घर बांधण्यासाठी माहेरून तीस हजार रुपये आणण्याची वारंवार मागणी केली जात होती. त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक छळही सुरू होता. अखेर या छळाला कंटाळून ७ जुलै रोजी आशाने पेनटाकळी धरणात उडी घेत आत्महत्या केली.

या प्रकरणी आशाचा भाऊ नितीन भीमराव अवसरमोल (वय २४, रा. नांद्रा धांडे, ता. मेहकर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!