पंजाब डख यांनी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ३९ मिनिटांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज दिला आहे. ते भुसावळकडून जळगावकडे जात असताना अजंठा लेणीजवळून हा अंदाज देत आहेत
राज्यात पुढील १५ दिवस तीव्र थंडीची लाट कायम राहणार असल्याचा मुख्य अंदाज वर्तवला आहे. विशेषत ११ तारखेपासून थंडी वाढत जाईल आणि १३, १४, १५ तारखेच्या दरम्यान दिवसा देखील थंड वातावरण आणि थंडी जाणवेल असे त्यांनी नमूद केले आहे.
ही तीव्र थंडीची लाट पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा यासह संपूर्ण राज्यामध्ये जाणवणार आहे. निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, अकोला, वाशिम, नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, पुणे अशा सर्व ठिकाणी थंडी वाढेल..














