बुलढाणा (अल्ताफ खान – बुलढाणा कव्हरेज न्यूज): पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पलसिद्ध अर्बन बुलढाणा संस्थेच्या वतीने बुलढाणा तालुक्यातील दोन कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात सुप्रसिद्ध कूक व कृषी अधिकारी रूपालीताई गायकवाड आणि युवा साहित्यिक कुमारी नम्रता सुनील रिंढे यांना आहिल्या रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेच्या बुलढाणा येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाला.
अनुकंपावरील दहा हजार पदे भरणार; उमेदवार नियुक्तीचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांचे
या प्रसंगी दोन्ही पुरस्कार विजेत्या महिलांना शाल, पुष्पगुच्छ आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कार समारंभाला संस्थेचे अध्यक्ष कौतीकराव पाटील, दलित मित्र भुजंगराव पाटील, माजी सभापती जालिंदर भालेराव, सरपंच गझमफर खान, राणा इंद्रसिंग राजपूत, शीतलताई देशमुख, धनशाम रिंढे, सचिनराव खरे, जीवनराव शेळके, अनिल खोलगडे यांच्यासह संस्थेचे अनेक कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रूपालीताई गायकवाड यांनी आपल्या खाद्यकलेतील कौशल्य आणि कृषी क्षेत्रातील योगदानाने बुलढाणा तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्याचप्रमाणे, कुमारी नम्रता रिंढे यांनी साहित्य क्षेत्रात आपल्या तरुण वयातच उल्लेखनीय कार्य करून समाजात सकारात्मक संदेश पसरवला आहे. या दोन्ही महिलांनी आपल्या कर्तृत्वाने इतरांना प्रेरणा दिली आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या दोन्ही महिलांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष कौतीकराव पाटील यांनी सांगितले. हा समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.