चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बांधकाम कामगार योजना या सरकारी योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकरून कीट वाटप केले जाते. या कीटमध्ये पेटी आणि इतर आवश्यक साहित्य असते. मात्र, वेळेवर उपस्थित राहूनही काही कामगारांना कीट मिळत नाही, आणि त्यांचा अर्ज रद्द होण्याची भीती असते. चिखली शहर आणि तालुक्यातील सुमारे ३०० कामगारांनी नियोजित तारखेला हजेरी लावली होती, पण सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक समस्या आल्याने त्यांना कीटपासून वंचित राहावे लागले. या मुद्द्यावरून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी थेट हस्तक्षेप करत आक्रमक भूमिका घेतली.
Bank of Maharashtra Recruitment: 500 अधिकारी जागांसाठी अर्ज सुरू, पात्रता आणि तारखा जाणून घ्या!
कामगारांनी राहुल बोंद्रे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ते लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांशी आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्याशी फोनवर बोलणे केले. मंत्री फुंडकर यांनी तांत्रिक अडचणी दूर करून सात दिवसांत कीट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.
विधवा किंवा विधुर पतीला दरवर्षी २४ हजार रुपये मिळणार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
गरीब आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी नेहमीच संघर्ष करणारे राहुल बोंद्रे यांचे हे प्रयत्न सोमवार, २५ ऑगस्ट रोजी विशेष लक्षवेधी ठरले. चिखली आणि परिसरातील हे ३०० कामगार आपले रोजचे काम सोडून कीट घेण्यासाठी आले होते. पण ठेकेदाराकडून तांत्रिक कारणांमुळे वितरण होऊ शकले नाही. याशिवाय, सोमवारीच कीट न मिळाल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता होती आणि ठेकेदारावरही कारवाई होण्याचे सरकारी निर्देश होते. अशा परिस्थितीत राहुल बोंद्रे यांनी मुख्य सचिव आणि मंत्री फुंडकर यांच्याशी चर्चा केली. मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करत लवकरच समस्या सोडवून सात दिवसांत कीट देण्याचे सांगितले.
या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर, तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, युवक शहराध्यक्ष रिकी काकडे, युवक तालुकाध्यक्ष अंबादास वाघमारे, सतीश शिंदे, खविस अध्यक्ष ईश्वरराव इंगळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने कामगार बांधव हजर होते.
तालुक्यातील अनेक कामगार आपला धंदा सोडून चिखलीला कीट घेण्यासाठी आले होते. तांत्रिक अडचणींमुळे ते वंचित राहणार होते, पण राहुल बोंद्रे यांच्या आक्रमक प्रयत्नांमुळे मंत्री फुंडकर यांनी सात दिवसांत नोंदणीकृत कामगारांना पुन्हा बोलावून कीट वाटप करण्याचे सांगितले. यामुळे कामगारांनी राहुल बोंद्रे यांचे मनापासून आभार मानले आणि हे शक्य झाल्याचे त्यांच्या आंदोलनामुळेच असल्याच्या भावना व्यक्त केल्या.













