मेरा खुर्दच्या सरपंच रमेश अवचार यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला अमरावती अपर आयुक्तांकडून स्थगिती

मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अपात्र; सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले

मेरा खुर्द (अंकुश पाटील- बुलढाणा कव्हरेज न्यूज): मेरा खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच रमेश अवचार यांच्याविरुद्ध शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक रहिवासी दीपक शिंगणे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर उपजिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 च्या कलम 14(1)(ज-3) अंतर्गत रमेश अवचार यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवले होते. हा निर्णय 21 जुलै 2025 रोजी प्रकरण क्रमांक 28/2024-25 मध्ये जाहीर करण्यात आला होता.

मेरा खुर्दचे सरपंच रमेश अवचार शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अपात्र; सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले

या निर्णयाविरुद्ध रमेश अवचार यांनी अमरावती येथील अपर आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 च्या कलम 16(2) अंतर्गत अर्ज सादर करून उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली. यासोबतच त्यांनी स्थगितीचा अर्जही दाखल केला. 23 जुलै 2025 रोजी अवचार यांच्या वकिलाने अपर आयुक्तांच्या न्यायालयात तोंडी युक्तिवाद करत उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश चुकीचा असल्याचा दावा केला.

अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या न्याय शाखेत निश्चित केली आहे. त्यांनी आदेश दिला की, तोपर्यंत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या 21 जुलै 2025 च्या आदेशाला जैसे थे स्थितीत स्थगिती देण्यात येत आहे. अर्जदार रमेश अवचार आणि तक्रारदार दीपक शिंगणे यांना सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुपस्थित राहिल्यास एकतर्फी निकाल दिला जाईल, असेही अपर आयुक्तांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!