चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतीच्या वादातून शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली असून, परस्पर विरोधी तक्रारींवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेंडगाव येथे ही घटना घडली. कमल भानुदास गीते (४५) आणि प्रल्हाद यादव गीते (४८, दोघे रा. मेंडगाव) यांच्यात शेतीसंबंधी वाद झाला. वाद चिघळून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली आणि चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! स्वयंचलित कृषी यंत्रांवर 50% अनुदान, काय आहे योजना?
कमल गीते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “तुझ्या नवऱ्याने शेतातील सामाईक फटी का डवरली नाही?” या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. दुसरीकडे, प्रल्हाद गीते यांनीही प्रत्युत्तरात तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांनी तिघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.