मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – नगरपालिका निवडणुकीची धडाकेबाज सुरुवात मेहकरमध्ये झाली असून शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीकडून अजय अरविंद उमाळकर यांनी आज दुपारी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. गेल्या तीन दिवसांत एकही अर्ज न येता, आज दाखल झालेला हा पहिलाच अर्ज आहे.११ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अजय उमाळकर यांच्या नावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली होती. महायुतीतील वरिष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात चर्चा सुरू असल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले होते.अर्ज दाखल करताना उमाळकर यांच्यासोबत अंजली अजय उमाळकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहरप्रमुख जयचंद बाठीया, रविराज रहाटे, जितू सावजी, घनश्याम पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.अजय उमाळकर हे यापूर्वी नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
मेहकर नगराध्यक्षपदासाठी शिवसेना कडून अजय उमाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल..!
Updated On: November 14, 2025 3:01 pm
















