अंचरवाडी (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंचरवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २३ जून २०२५ (रविवार) रोजी आयोजित करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.
या शिबिरात खालील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध राहणार आहे:
- डॉ. विशाल सावळे – (एम.डी. मेडिसिन)
- डॉ. पवन राऊत – हाडांवरील तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक)
- डॉ. आखाडे – बालरोग तज्ज्ञ
- डॉ. बंगाळे – नेत्ररोग तज्ज्ञ
- डॉ. योगिता महाडिक – दंतरोग तज्ज्ञ
- डॉ. अतुल पवार- स्री रोग तज्ञ
शिबिरात तपासणीसह रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जाणार आहेत.
या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष परिहार, संतोष आटोळे, शेख असीफभाई, युवक अध्यक्ष रुपेश रिंढे आणि आनंदा वायसे यांनी केले आहे.
1 thought on “अंचरवाडी येथे २३ जूनला महाआरोग्य शिबिराचे आयोजन आ. मनोजभाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम…”