जानेफळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पती, सासू आणि नणंद यांनी अमानुष वागणूक करत तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. महिलेने नकार दिल्यावर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता तिला दोन दिवस जबरदस्तीने घरात डांबून ठेवण्यात आले.या धक्कादायक घटनेची नोंद जानेफळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मेहकर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित महिलेवर २०१५ ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. पती, सासू आणि नणंद तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होते. मात्र, तिने नकार दिल्यावर तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला.या अत्याचाराचा प्रकार अधिक भयावह ठरला, जेव्हा सासू आणि नणंद यांच्या सांगण्यावरून आरोपी शाम मधुकर मेतकर (३६, रा. जानेफळ), शेख मोहम्मद शेख शब्बीर (४५, रा. वरवंड, ता. मेहकर) आणि इतरांनी तिच्यावर बलात्कार केला.
या दरम्यान तिला मारहाण करत दोन दिवस बंदिस्त ठेवण्यात आले.तिघांना अटक, न्यायालयीन कोठडीया प्रकरणी एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी शाम मेतकर, शेख शब्बीर आणि पीडितेच्या नणंदेला अटक केली आहे. अटक आरोपींना मेहकर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.