वळतीचे सुपुत्र ललित धनवे यांनी साकारला चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा!

वळतीचे सुपुत्र ललित धनवे यांनी साकारला चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा!

चिखली (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. हा पुतळा शहराच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थापित होणार असून, यासाठी पुण्यातील कराहा स्टुडिओचे (Karaha Studio) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ललित धनवे यांनी पुढाकार घेतला आहे.

अभिमानास्पद..! वळतीच्या संतोष खरातने ८व्या ओपन इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये रौप्यपदक पटकावले!

त्यांच्या नेतृत्वाखाली कराहा स्टुडिओने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा पुतळा ब्राँझ धातूपासून बनवला जाणार असून, त्याची उंची 15 फूट आणि वजन 2200 ते 2300 किलोग्रॅम इतके असेल. या शिल्पकृतीवरील चित्रकला सौ. कविता देशमुख यांनी रेखाटली आहे, तर इटलीतील नामांकित शिल्पकला कंपनी एफएए आणि शिल्पकार प्रसाद मोडक यांच्या सहकार्याने ललित धनवे यांनी हा पुतळा साकारला आहे.

चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार; विधीवत पूजेनंतर जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण

ललित धनवे हे कराहा स्टुडिओचे (Karaha Studio) संस्थापक आणि सीईओ म्हणून शिल्पकलेतील आपल्या उत्कृष्ट कौशल्यासाठी ओळखले जातात. पुण्यात स्थापित असलेल्या कराहा स्टुडिओने यापूर्वीही अनेक उल्लेखनीय शिल्पकृती साकारल्या असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. ललित धनवे यांनी या प्रकल्पासाठी इटलीतील FAA कंपनीसोबत सहकार्य करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आणि शिल्पकलेचे बारकावे यांचा समन्वय साधला आहे. त्यांच्या सहकार्याने आणि शिल्पकार प्रसाद मोडक यांच्या साथीने हा पुतळा चिखली शहराच्या सौंदर्यात आणि सांस्कृतिक वारशात भर घालणारा ठरणार आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आकाराला येत आहे. त्यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या पुतळ्यासाठी सर्व प्रशासकीय मान्यता आणि 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करवला. सध्या या ठिकाणी असलेला 1985 मध्ये स्थापित पूर्णाकृती पुतळा आज दि. २५ जून ला विधीवत पूजा आणि अभिषेकानंतर काळजीपूर्वक खाली उतरवण्यात आला आहे.

खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या; अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन एआयसी च्या मुंबईच्या कार्यालयात घुसू!…तुपकर आक्रमक!

या प्रक्रियेत तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या नवीन पुतळ्याच्या उभारणीसाठी कराहा स्टुडिओने अत्यंत काटेकोर नियोजन केले आहे. ललित धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला हा पुतळा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी व्यक्तिमत्त्वाचे आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाचे प्रतीक आहे. हा पुतळा चिखलीकरांच्या शिवप्रेमाला साजेसा असून, शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला नवा आयाम देणारा ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!