ग्राहकाकडून 500 रुपये घेते, आम्हाला फक्त 200 रुपये देते; 70 वर्षीय कडूबाई ने चार खोल्या मध्ये…

ग्राहकाकडून 500 रुपये घेते, आम्हाला फक्त 200 रुपये देते; 70 वर्षीय कडूबाई ने चार खोल्या मध्ये…

छत्रपती संभाजीनगर (बुलढाणा कव्हरेज न्यूज): धुळे-सोलापूर महामार्गावरील तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर परिसरात एका निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर स्थानिक पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत ७० वर्षीय कडूबाई भिकन पवार (रा. पंढरपूर) ही कुंटणखाना चालवत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून, कडूबाईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरने स्वतःला भर रस्त्यात पेटवून घेतले, प्रकृती गंभीर; नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील घटना, व्हिडिओ वायरल

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, खवड्या डोंगराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये अनैतिक व्यवसाय चालतो. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी तातडीने पथक तयार केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे आणि महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. कारवाईसाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाची योजना आखली.

बनावट ग्राहकाने कडूबाईकडे संपर्क साधला आणि ‘सेवे’साठी ५०० रुपये देण्याची तयारी दर्शवली. कडूबाईने पैसे स्वीकारल्यानंतर एका महिलेला खोलीत पाठवले. यावेळी बनावट ग्राहकाने पोलिसांना ठरलेला इशारा दिला आणि पोलिसांनी तात्काळ शेडवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान शेडमध्ये चार खोल्या आढळल्या. यापैकी दोन खोल्यांमधून दोन महिला आणि दोन पुरुष बाहेर आले. पोलिसांनी या महिलांची चौकशी केली असता, त्यांनी धक्कादायक माहिती उघड केली. वय ४० आणि ४८ असलेल्या या महिलांनी सांगितले की, कडूबाई त्यांच्यावर जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत होती. ग्राहकाकडून ५०० रुपये घेतल्यानंतर ती त्यांना फक्त २०० रुपये देत होती, तर उरलेली रक्कम स्वतः ठेवत होती.

पोलिसांनी शेडमधून ३,००० रुपये रोख, काही कंडोमची पाकिटे आणि गाद्या जप्त केल्या. शेडमधील स्वच्छतेची अवस्था अत्यंत बिकट होती. वापरलेले कंडोम अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त असल्याने ते जप्त करण्यात आले नाहीत.

सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एका महिलेने सांगितले की, ती घरच्यांना कंपनीत कामाला जाते असे सांगून या ठिकाणी येत होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांच्या फिर्यादीवरून कडूबाई पवार यांच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा, जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवणे आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी या कारवाईत कडकपणा दाखवत असून, अशा प्रकारच्या अनैतिक व्यवसायांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “ग्राहकाकडून 500 रुपये घेते, आम्हाला फक्त 200 रुपये देते; 70 वर्षीय कडूबाई ने चार खोल्या मध्ये…”

Leave a Comment

WhatsApp Join Group!