BREAKING : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या कारला भीषण धडक; परिवार थोडक्यात बचावला…!

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)आज सकाळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक हे आपल्या कुटुंबासह सकाळी दहा वाजता ते अकरा वाजे दरम्यान शेगावकडे जात असताना त्यांच्या कारला मागून जोरदार धडक बसली. उदयनगर येथील स्पीड ब्रेकर एका मारुती कारने सरनाईक यांच्या गाडीवर पाठीमागून धडक दिली.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीत प्रवास करणाऱ्यांना किरकोळ लागल्याची माहिती मिळाली आहेत. विनायक सरनाईक यांच्या मानेला झटका बसल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी आमडापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार निर्मळ यांना माहिती मिळतास त्यांनी पोलिस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी पाठवले तात्काळ भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!