खुलताबाद (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याने त्रस्त झालेल्या विवाहित महिलेने अखेर खुलताबाद पोलिस ठाण्यात धाव घेतली. शेतात काम करत असताना तिच्याशी अश्लील वर्तन करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
ही घटना २८ मार्च २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास खुलताबाद परिसरातील शेतात घडली. ३२ वर्षीय महिला आपल्या मुलीसह शेतात काम करत असताना, शेखर उत्तम पुरी (रा. खुलताबाद) हा तिच्याकडे येऊन “तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो” असे म्हणत अश्लील टिप्पणी करू लागला. यावेळी त्याने महिलेचा हात पकडण्याचाही प्रयत्न केला.
महिलेनं आरडाओरड केल्यावर शेखरने तिला आणि तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. घरी परतल्यानंतर पीडितेने हा संपूर्ण प्रकार आपल्या पती आणि सासूला सांगितला. मात्र बदनामीच्या भीतीने सुरुवातीला तिने तक्रार करण्याचे टाळले.
त्याच्या सोबत बळजबरी करून ते काढून घेतलं! चाकूचा धाक; जीवाने मारण्याची धमकी! अजून काही बरच…
मात्र, घटनेनंतर काही दिवसांनी म्हणजेच १६ एप्रिल रोजी, शेखर पुन्हा महिलेच्या घरी येऊन शिवीगाळ करत पुन्हा धमकी देऊ लागला. यातून सुटका मिळवण्यासाठी आणि त्रासाच्या घटनांना आळा घालण्यासाठी अखेर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी शेखर पुरी याच्याविरुद्ध विनयभंग, दमदाटी आणि धमकी देण्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.