चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखलीकरांच्या प्रश्नांमध्ये, त्यांच्या अडीअडचणींमध्ये, सुखदुःखात आम्ही सदैव उभे राहिलो. बोंद्रे परिवाराला पूर्वीपासून चिखलीकरांचे अफाट प्रेम मिळत असून यापुढे ते मिळत राहणार आहे. चिखलीकरांचे आणि बोंद्रे कुटुंबियांचं नातं हे राजकीय फायद्याचं नसून विश्वासाचं आहे. या विश्वासावर आम्ही आजपर्यंत काम करत आलो आणि पुढेही काम करत राहणार आहे. बोंद्रे परिवाराला मायबाप असलेल्या चिखलीच्या जनतेचे प्रेम मिळणे, त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभणे, ही घराणेशाही आहे का? असा सवाल महाविकास आघाडीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी भाजपला केला आहे.
काशिनाथ आप्पा बोंद्रे म्हणाले की, सेवा ही परंपरा असते, सत्ता नव्हे. आम्ही राजकारणात जनतेच्या विश्वासाने आलो आहे. गेल्या अनेक वर्षांत रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य, नागरी सुविधा यासह विविध घटकावर काम केले आहे. जनतेच्या घामाच्या पैशाचा योग्य उपयोग करणे ही घराणेशाही नसून माझी जबाबदारी आहे.
विकासाचे मुद्दे हातात नसले की काही जणांकडून घराणेशाहीचा बागुलबुवा उभा केला जातो. ज्यांच्याकडे स्वतःच्या कामाची दाखवण्यासारखी स कर्तृत्वाची वही नाही, तेच इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. जनता सर्व जाणते, तिलाव आरोपांची नाही तर कामांची पावती हवी आहे, प्र असेही काशिनाथ आप्पा यांनी सांगितले.
भाजप जनमताचा अनादर करते का..?
जनतेच्या सुखदुःखात धावून गेल्यानंतरच जनता राजकीय लोकांना डोक्यावरच घेत असते. बोंद्रे परिवारातील सदस्य कायम चिखलीकरांच्या सेवेत असतात. जनतेची नि सातत्याने काम करत आल्यामुळेच मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे. कर्मयोगी तात्यासाहेब, राहुलभाऊ, प्रियाताई हे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ते सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळेच. लोकशाहीत मतदारांनी दिलेला ड कौल, भाजपला मान्य नाही का? भाजप जनमताचा अनादर करते का? असा प्रश्नही ज काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी उपस्थित केला.













