करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू

नवऱ्याच्या माघारी दिरासोबत केले खोटे लग्न; मी तुला मारून टाकू का? असे म्हणताच दिराने....

धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा तालुक्यातील करडी गावातील सहकार विद्या मंदिर शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ४ जुलै २०२५ रोजी दुपारी घडली. राजवीर मनीषराव देशमुख (वय ८, रा. तराडखेड) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना समजल्यानंतर गावात आणि शाळेत शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी दुपारी शाळेच्या आवारात राजवीर इतर मुलांबरोबर खेळत होता. खेळताना अचानक तो खाली कोसळला. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने राजवीरला धाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केोले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. राजवीरच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर आणि गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार आशीष चचेरे यांनी शाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या राजवीरच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पोलीस आणि वैद्यकीय तज्ज्ञ याबाबत अधिक तपास करत असून, मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू”

Leave a Comment

WhatsApp Join Group!