चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – चिखली नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रभागातून प्रिती ताई बांडे फुलझाडे यांनी काँग्रेस पक्ष तर्फे उमेदवारी जाहीर केल्यानंतर मतदारांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.
प्रीती ताई या साध्या, कष्टकरी शेतकरी कुटुंबातील उमेदवार असल्याने त्यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये सकारात्मकता दिसून येते. “आमच्यातलीच एक उमेदवार” अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली असून, आता या प्रभागात जनशक्ती आणि धनशक्ती यांच्यात खरी लढत होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.
सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी, उपलब्ध राहणारी आणि सर्वांसाठी काम करण्याची तयारी असलेली उमेदवार अशी प्रिती ताईंची प्रतिमा तयार होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढू लागली आहे.













