HSRP नंबर प्लेटसाठी राज्य सरकारची पुन्हा मुदतवाढ; १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख

HSRP नंबर प्लेटसाठी राज्य सरकारची पुन्हा मुदतवाढ; १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख

(बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्रातील जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी राज्य सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ (hsrp number plate last date) जाहीर केली आहे. १ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ही विशेष नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. आता वाहनधारकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही शेवटची संधी असून, या मुदतीनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत केवळ २३ लाख वाहनांवर HSRP बसवण्यात आल्या आहेत. तसेच, ४० लाख वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अद्याप १.२५ कोटी वाहने या योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. HSRP नंबर प्लेटच्या पुरवठ्यात होणारा विलंब आणि काही फिटमेंट केंद्रे बंद झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने संबंधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात HSRP तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा अनोखा अंदाज: ‘नथ’ कवितेने जिंकली सर्वांची मने

HSRP नंबर प्लेट्स या विशेष अल्युमिनियम धातूपासून बनवल्या जातात. त्यावर युनिक लेझर कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि ‘IND’ चिन्ह असते. या प्लेट्समुळे वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट्सच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. तसेच, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे या प्लेट्स सहज ओळखल्या जाऊ शकतात, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थापन आणि नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होते.

वाहनधारकांना या मुदतीचा लाभ घेऊन लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट बसवण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी www.bookmyhsrp.com किंवा www.siam.in या अधिकृत वेबसाइट्सचा वापर करावा. बनावट वेबसाइट्सपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. मुदत संपल्यानंतर मोटार वाहन कायदा १९८८, कलम १७७ अंतर्गत १,००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “HSRP नंबर प्लेटसाठी राज्य सरकारची पुन्हा मुदतवाढ; १५ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख”

Leave a Comment

WhatsApp Join Group!