चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – भाजप देशातील नागरिकांना मोजत नाही, उलट माणसामाणसात फूट पाडत आहे. राज्यातील नागरिकांचे उत्पन्न घटले, तर युवकांना रोजगार नाही. लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू केली आहे. चिखलीतील सुसंस्कृत राजकारण भाजपने संपवले असून, आता चिखलीत काँग्रेसचाच नगराध्यक्ष हवा, असा ठाम निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.रविवार, ९ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात झालेल्या काँग्रेस आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सपकाळ म्हणाले की, राहुलभाऊ बोंद्रे यांनी तब्येत बिघडूनही पक्षासाठी दिवस-रात्र काम केले आहे. अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि चिखलीत काँग्रेसचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत, शहराच्या स्वच्छता कंत्राटात ७५ लाखांवरून अडीच कोटी रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे सांगितले. “भ्रष्टाचाराचा पैसा कोणाच्या घरात गेला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“चिखलीत मला काँग्रेसचाच नगराध्यक्ष हवा; भाजपने लोकशाही संपवून हुकूमशाही सुरू केली” – हर्षवर्धन सपकाळ..! जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले…“भ्रष्टाचाराचा पैसा कोणाच्या घरात गेला?”
Published On: November 10, 2025 4:58 pm
















