गतिमान विकासाची गाडी निवडून आणूया महाविकास आघाडी!” — चिखलीत घुमला जनतेचा संकल्प

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षित व भयमुक्त वातावरणासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी येणारी नगरपरिषद निवडणूक अत्यंत महत्वाची ठरत आहे. यंदा चिखली शहरातील अनेक नागरिकांनी एकमुखाने घोषवाक्य दिले आहे — “गतिमान होण्या विकासाची गाडी निवडून आणूया महाविकास आघाडी!”

महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथआप्पा बोंद्रे आणि सर्व प्रभागांतील आघाडीचे उमेदवार यांना चांगला जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात स्थिर, जबाबदार आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचे मतदार व्यक्त करत आहेत.

सध्या आघाडीच्या सर्व २८ उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. घराघरातील भेटी, छोट्या-मोठ्या बैठका, गल्लीनिहाय जनसंवाद यातून नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे व त्यावर उपाययोजना मांडणे यावर भर दिला जात आहे. प्रभाग १ ते १४ मधील बैठकींना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि शहराच्या मूलभूत रचनेत सुधारणा—यासंबंधित विषयांवर मतदारांचा विश्वास आघाडीच्या आश्वासनांकडे वाढताना दिसत आहे.

काशिनाथ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास

सौम्य स्वभाव, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यामुळे काशिनाथआप्पा बोंद्रे यांची लोकप्रियता शहरभर दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सर्व समाजघटकांना समान संधी, तरुणांसाठी रोजगाराचे मार्ग, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!