खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): ‘गेम करना पडेगा तेरा’ असा मेसेज पाठवून खामगाव येथील ‘युवा हिंदू प्रतिष्ठान’चे संस्थापक रोहित सुरजमल पगारिया (वय ३६) यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर पाठवण्यात आली असून, याप्रकरणी रोहित पगारिया यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेचा मागोवा घेतला असता, १७ जून रोजी रोहित पगारिया यांनी खामगावच्या तलाव रोड परिसरात गौवंशाचे अवशेष असलेली एक बोलेरो पिकअप गाडी पकडली होती. ही गाडी त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली होती. या घटनेची माहिती त्यांनी स्थानिक माध्यमांना दिली होती.
थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मंजूर: येवती ग्रामपंचायतीत राजकीय वादळ!
यासंदर्भात त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनंतर १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या इन्स्टाग्राम आयडी (rohitpagariya) वर ‘abidqureshi17’ या आयडीवरून ‘गेम करना पडेगा तेरा’ (Game kar na padta tera) असा धमकीचा मेसेज आला.
या धमकीमुळे धास्तावलेल्या रोहित पगारिया यांनी तात्काळ आपल्या मित्रासह शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि या मेसेजची तक्रार नोंदवली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय उभे करत आहेत. पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला असून, इन्स्टाग्राम आयडीच्या आधारे त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
1 thought on “गेम करना पड़ेगा तेरा..! मेसेज पाठवून ‘युवा हिंदू प्रतिष्ठानचे संस्थापक’ रोहित पगारिया यांना जीव मारण्याची धमकी!”