बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात आर्थिक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून चार महिलांनी मायलेकींना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या जखमी मायलेकींवर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खळबळजनक..! बेपत्ता विद्यार्थिनीने चुलत भावासोबत केल लग्न; चिखली तालुक्यातील घटना…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या महिलांची नावे विमल धांडेकर, कमल धांडेकर, सुमन चव्हाण आणि दिपाली मंजुळकर अशी आहेत. या प्रकरणाचा तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मायलेकींनी आरोपी महिलांपैकी एकीकडून काही रक्कम उसने घेतली होती. ही रक्कम परत करण्यास उशीर झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपी महिलांनी मायलेकींवर लाकडी दांड्याने हल्ला केला.